तसा मी निबंध खूप लिहिलेत. पण मला त्यसाठी मार्क कधीच मिळाले नाहीत. अगदी १० वी पर्यंत... नेहमी मला त्यात मोठ्ठा शून्य मिळायचा. कारण मला अजूनही समजलेले नाही.... आता सुद्धा एक निबंध लिहीत आहे. किमान मला सांगा तरी माझे काय चुकते?....
निबंध....एकता.... ( हो मला असेच विषय असायचे निबंध लिहिण्यासाठी )
एकता.... एकता म्हणजे एकीने राहणे. आता तुम्ही म्हणाल की जर फक्त एकीने राहणे तर दुसरीने कुठे जाणे? ते मला काय माहित? तिला विचारा ना! बहुतेक ती गेली असेल एखादा चित्रपट पाहण्यासाठी. त्या चित्रपटामध्ये सुद्धा एक एकता आहे. ती अमीर खान ची हिरोईन आहे. आता ती चित्रपटात काम करीत नाही कारण तिने मोहनीश बहल याच्याशी लग्न केले आणि तो तर खलनायक आहे मग तो तिला कसे काय आता चित्रपटात काम करू देईल? आता तो टीव्ही वर सिरिअल मध्ये सुद्धा काम करतो. टीव्हीवर सुद्धा एक एकता आहे. ती एकाच कथेवर 'क' हे अक्षर घेऊन खूप सिरीयल बनवते. तिचे वडील जितेंद्र आहे. जितेंद्र हा शब्द जितेंद्रिय या शब्दाचा अपभ्रौंश आहे. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर जय मिळविणारा. पण याला हे कधीच जमले नाही त्यामुळे तो नाचताना फक्त माकडा सारख्या उदया मारायचा. त्याला एक मुलगा सुद्धा आहे. त्याचे नाव तुषार आहे. तो फक्त 'एओ एओ' करीत असतो. त्याचं काय अर्थ आहे हे तुम्ही त्याला विचारू शकतात. कारण त्याला कोणीच काम देत नसल्यामुळे तो नेहमीच रिकामटेकडा असतो. त्याची बहिण एकता ही काळे कपडे घालते. आणि कपाळावर मोठ्ठे गंध लावते. ती आपल्या पेहेरावावरून आपण समाजाला काय देतो हे सुचवते. एकता वर मला अजूनही खूप काही बोलता येईल पण फक्त १० मार्कांसाठी मी माझा वेळ वाया घालू शकत नाही. जो माझ्या निबंधाला १० पैकी १० मार्क देणार नाही त्याच्या जीवनावर एकता नवीन सिरिअल काढेल आणि त्याला हिरो म्हणून घेऊन त्याच्या बायकोचे किमान १० लफडे दाखवेल अशी मी देवाजवळ प्रार्थना केली आहे.
मिलिंद जोशी, नाशिक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा