आठवण...
माझ्या सावलीलाही आता
सवय झालीय तुझ्या आठवणींची
मनात निरंतर पाझरणार्या
तुझ्या आठवांच्या साठवणींची
माझ्या सावलीलाही आता
सवय झालीय तुझ्या आठवणींची
मनात निरंतर पाझरणार्या
तुझ्या आठवांच्या साठवणींची
येता अश्रुंचा उमाळा गतस्मृतींनाही
सवय झालीय पापण्याना ओलेपणाची
सहावासातील बोलक्या क्षणांना
तुझ्या त्या प्रेमळ सुखद अस्थित्वाची
सावरतोय एकटाच जीवाला तरिही
तगमग होतेय या भाबड्या जिवाची
कासावीस या मनातल्या वेदनांना
सवय झालीय हृदयी रुतलेल्या काट्यांची
गेलीस उडुन अबोलपणे पक्षासारखी
भावनांना उरली जाणिव एकट्पणाची
हाती आल्या त्या केवळ रेशिमगाठी
तरिही ओढ जिवाला त्या पाऊलखुणांची..
- श्रीकांत दामले (१३-१-२०१५)
सवय झालीय पापण्याना ओलेपणाची
सहावासातील बोलक्या क्षणांना
तुझ्या त्या प्रेमळ सुखद अस्थित्वाची
सावरतोय एकटाच जीवाला तरिही
तगमग होतेय या भाबड्या जिवाची
कासावीस या मनातल्या वेदनांना
सवय झालीय हृदयी रुतलेल्या काट्यांची
गेलीस उडुन अबोलपणे पक्षासारखी
भावनांना उरली जाणिव एकट्पणाची
हाती आल्या त्या केवळ रेशिमगाठी
तरिही ओढ जिवाला त्या पाऊलखुणांची..
- श्रीकांत दामले (१३-१-२०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा