तिर्यक रेखा. ...............
मी सावलीच्या रूपात ,
तुझ्या आठव चे ओझे
नकळत सराव करतो ,
तुझ्या दिलेल्या क्षणांशी
मी माझे श्वास देवून
मोलभाव करतो.
हिशोब नेहमी चुकीचा वाटतो,
मग क्षण एक एकांताचा लाभतो
अप्रत्यक्ष होठांवर एक हास्य,
प्रेमाला एक भाष्य,
आणि मी बडबडत सुटतो.
किती हि नाकारलं तुला
तरी तू माझे अस्तित्व आहेस,
काळीज हि शरीरातून
काढून फेकले जरी तरी
त्या सोबत आहेस.
हा दुरावा काय
क्षण- दोन क्षणांचा.
पण जीवनात तुझ्या सवे
हा काट- कोण स्वतः चा.
आवडतो मला.
मी तिर्यक रेखा प्रमाणे
दोन टोके मिळवण्याचा
प्रयत्न करतो.
आणि हे कैवल्य हि माझे के
मी याच साठी गुदमरतो.
- संजय हेडाऊ
मी सावलीच्या रूपात ,
तुझ्या आठव चे ओझे
नकळत सराव करतो ,
तुझ्या दिलेल्या क्षणांशी
मी माझे श्वास देवून
मोलभाव करतो.
हिशोब नेहमी चुकीचा वाटतो,
मग क्षण एक एकांताचा लाभतो
अप्रत्यक्ष होठांवर एक हास्य,
प्रेमाला एक भाष्य,
आणि मी बडबडत सुटतो.
किती हि नाकारलं तुला
तरी तू माझे अस्तित्व आहेस,
काळीज हि शरीरातून
काढून फेकले जरी तरी
त्या सोबत आहेस.
हा दुरावा काय
क्षण- दोन क्षणांचा.
पण जीवनात तुझ्या सवे
हा काट- कोण स्वतः चा.
आवडतो मला.
मी तिर्यक रेखा प्रमाणे
दोन टोके मिळवण्याचा
प्रयत्न करतो.
आणि हे कैवल्य हि माझे के
मी याच साठी गुदमरतो.
- संजय हेडाऊ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा