मी तुला दिसणार नाही !.
.
ऐकाया तुज काही आले, मी बोललेच नाही.
माझिया मनाचे कवडसे मी खोललेच नाही.
त्या निसटत्या पाऊली मी सावरले स्वप्न माझे,
हुरहुरत्या स्पर्शाने मी कधी खुललेच नाही.
आजवरी जे होते, माझे उरलेच नाही,
मद्याह्नीच्या काजव्यांना मी कधी भुललेच नाही.
अंतरीची आर्त साद ना कधी तू ऐकली,
आज तुजला प्रतिसाद देण्या शब्द मी स्मरलेच नाही.
या पुढे कधीही अशी मी बेसावध असणार नाही,
पाहशी वळूनी जरी तू, मी तुला दिसणार नाही ...
मी तुला दिसणार नाही ..........
..(रत्नकांत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा